पनवेल ः प्रतिनिधी
कष्टकर्यांचे द्रष्टे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 31व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि. 7) उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सकाळी 9.30 वाजता पुण्यतिथी कार्यक्रम व त्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने होणार्या या कार्यक्रमास समारंभ अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत. या वेळी विशेष अतिथी म्हणून सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य लक्ष्मणशेठ पाटील, समन्वय समिती सदस्य जी. आर. पाटील, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, तर सन्माननीय पाहुणे म्हणून महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य प्रकाश भगत, संजय भगत, भाऊशेठ पाटील, वसंत पाटील, छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. ए. डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.