Breaking News

भाजप सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल: रामप्रहर वृत्त
सत्ता असो की नसो सर्वसामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू मानून काम करणारा भारतीय जनता पक्ष आहे, असे प्रतिपादन भाजपचे मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि.6) येथे केले. भाजपचा 45वा स्थापना पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यलयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे म्हटले की, देशाचा विकास महत्त्वाचा आहे हे जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात संपूर्ण जगात भारताची एक मजबूत, न झुकणारा आणि विकासाकडे झेप घेणारा देश अशी प्रतिमा तयार झाली असून पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्वांना अभिमान आहे. स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी देशात विकासाची मुहूर्तमेढ रोवली आणि तो वारसा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी पुढे नेत देशाला विकासात्मक चेहरा दिला आहे. जगात सर्वांत जास्त सदस्य असेलला हा पक्ष आणि सबका साथ सबका विकास मूलमंत्र विधायक कार्याला प्रेरणा असल्याचेही त्यांनी नमूद केले तसेच अनेकांनी आपले आयुष्य पक्षासाठी वेचले आहेत असे अधोरेखित करून त्यांच्याप्रती आदरभावना व्यक्त करतानाच त्यांनी स्थापना दिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छाही दिल्या.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पक्ष आणि धोरणे या विषयी मार्गदर्शन केले. पक्षाची वाटचाल नेत्यांच्या नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांच्या खंबीर साथीने देदीप्यमान झाली आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा आणि लोकहिताचे कार्य करणारा हा पक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते अतुल पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, समीर ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष राजेश्री वावेकर, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहराध्यक्ष सुमित झुंझारराव, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, ज्योती देशमाने, शिल्पा म्हात्रे, विनोद पाटील, अभिषेक भोपी, प्रीतम म्हात्रे, रूपेश नागवेकर, विशाल म्हसकर, अशोक साळुंखे, रमेश नायर, पवन सोनी, महेश सरदेसाई यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला पदाधिकारी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply