Breaking News

नेरळमध्ये पोलिसांकडून रूट मार्च

कर्जत : बातमीदार

हिंदू-मुस्लिम धर्मियांचे पवित्र सण एकाच दिवशी आले असून कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नेरळ पोलिसांनी आपल्या हद्दीत  रूट मार्च केले. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संमिश्र वस्ती असून  गावात हिंदू आणि मुस्लिम धर्मीय अनेक वर्षे एकत्र राहत आहेत. कळंब गावातदेखील हिंदू, मुस्लिम लोकवस्ती आहे. यावर्षी मुस्लिम धर्मियांची पवित्र रमजान ईद आणि हिंदू धर्मातील अक्षय्यतृतीया हे महत्वाचे सण एकाच दिवशी आले आहेत. हे दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर   पोलिसांनी नेरळ आणि कळंब गावात शस्त्रांसह रुट मार्च केला. कर्जतचे पोलीस उपाधीक्षक विजय लगारे यांच्या  प्रमुख उपस्थितीत झालेल्या या रुट मार्चमध्ये  नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र तेंडूलकर यांच्यासह दोन अधिकारी आणि 40 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply