Breaking News

पेण नगर परिषद कर्मचार्‍यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

पेण : प्रतिनिधी

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनााचे लक्ष वेधण्यासाठी पेण नगर परिषदेचे कर्मचार्‍यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले असून, सोमवारी (दि. 2) दूसर्‍या दिवशी 97 अधिकारी व कर्मचार्‍यांनी ठिय्या आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 1 मे 2022 पासून बेमुदत कामबंद आंदोलनाची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत पेण नगर परिषदेचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांनी आज ठिय्या आंदोलन केल्यामुळे पेण नगर परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते.  सोमवारी सकाळी पेण नगर परिषद कर्मचारी संघटना गठीत करुन अध्यक्षपदी शिवाजी चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. या वेळी रमेश नागू सोनावणे हे सफाई कामगार 22 वर्षाच्या सेवेतून सेवानिवृत झाल्याने मुख्याधिकारी जीवन पाटील, लेखापाल किरण शहा, अंकीता इसाळ, शिवाजी चव्हाण यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ, शाल, भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. यानंतर ठिय्या आंदोलन करून सर्वांनी एकजूट दाखविली. किरण शहा, शिवाजी चव्हाण, शेखर अभंग, आरोग्य विभागाचे अंंकिता इसळ, बांधकाम अभियंता बनसोडे, पाणी पुरवठा विभागाचे रमेश देशमुख, विश्वनाथ गायकवाड यांनी मार्गदर्शन करुन कामगारांमध्ये चैतन्य निर्माण केले. कर्मचारी संघटना आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहे, मात्र त्याचा अत्यावश्यक सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे  मुख्यधिकारी जीवन पाटील  यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply