वाशी : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) महाविद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन सोमवारी (दि. 18) करण्यात आले होते. हा समारंभ ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या विद्यार्थ्यांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. शिवणकर, उपप्राचार्य सी. डी. भोसले, डी. ए. मनोलकर, शुभदा नायक, डी. जी. बोटे, आशिष आवले, जिमखाना चेअरमन डॉ. बी. एम. मुंडे आदी उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.