पनवेल : वार्ताहर
सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या 83व्या जन्मोत्सवानिमित्त सामुदायिक कन्यादान उपक्रम राबविण्यात आला. या वेळी पाच जणींचे कन्यादान साईभक्तांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले. हा कार्यक्रम पनवेल येथील साई दरबारमध्ये झाला. या वेळी स्वतः नारायण बाबा वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेअरमन खेमचंद गोपलानी, कोऑर्डिनर राम थदानी, सचिव रामलाल चौधरी आदी उपस्थित होते.