Sunday , September 24 2023

खांदा कॉलनी, तक्क्यातही शिवरायांचा जयजयकार

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खांदा कॉलनी आणि तक्का येथे मंगळवारी (दि. 19) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीदेखील वाहण्यात आली. या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर विक्रांत पाटील, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, संजय भोपी, नगरसेविका चारुशीला घरत, सीता पाटील, कुसूम पाटील, संतोषी तुपे, उपायुक्त जमीर लेंगरेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, माजी नगरसेवक गणेश पाटील, मनोहर मुंबईकर, प्रभाकर बहिरा, लेफ्टनंट कमांडर दीपक जांभेकर, संजय सिंग, रघुनाथ बहिरा, मुरलीधर पगडे, ज्येष्ठ नागरिक तुकाराम बहिरा, समद मुकादम, अत्तार गणी, राजू बोरा, राम सारंग, राजू भाई, अफताब ताडे, अशोक परदेशी, रूपेश परदेशी, नरेंद्र कोंडविकलर आदींसह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Check Also

मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज

आमदार प्रशांत ठाकूर यांचे पनवेल मनपाच्या बैठकीत आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात …

Leave a Reply