उलवे नोडमध्ये योगा अभ्यास केंद्राचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
उलवे नोड सेक्टर 17 येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उलवे नोड यांच्या माध्यमातून महिलांसाठी योगा अभ्यास केंद्र बांधण्यात आले आहे. या केंद्राचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी व्यायाम हा आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे असे प्रतिपादन करुन महिला मोर्चाच्या कामाचे कौतुक केले.
उलवे नोडमध्ये वाढत्या नागरीकरणा सोबत अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. त्याअंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पुरस्काराने आणि भाजप महिला मोर्चा उलवेनोड महिला मोर्चातर्फे योगा अभ्यास केंद्र बांधण्यात आले आहे. या केंद्राचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उद्घाटन केले. या कार्यक्रमचे आयोजन उलवेनोड महिला मोर्चा अध्यक्षा योगीता भगत यांनी केले होते. या वेळी ज्येष्ठ नेते वाय. टी.देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल पंचायत समिती सदस्या तथा भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, वहाळ ग्रामपंचायत सदस्य वितेश म्हात्रे, मंजुळा कोळी, गीता ठाकूर, माजी सदस्या इंदू घरत, जयश्री कोळी, अनंता ठाकूर, वसंतशेठ पाटील, सुधिर ठाकूर, जयवंत देशमुख, अजय भगत, किशोर पाटील, व्हि.के.ठाकूर, सुनिल पाटील, अंकुश ठाकूर, विशाल म्हात्रे, विलास साळवे, नवनाथ जाधव, दिलीप चव्हाण, ज्ञानेश्वर म्हात्रे, संतोष भगत, अवदेश म्हात्रे, शेखर काशी, सुजाता पाटील, नितीन गाडीया, दिपा मोर्या, अर्चना मिश्रा, राजेश रणदिवे, प्रणय कोळी, सुहास भगत, अशीष घरत, आयोजक उलवे नोड महिला मोर्चा अध्यक्षा योगीता भगत, उपाध्यक्ष सुजाता पाटील, मीना म्हात्रे, शुभांगी पाटील, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी या योगा अभ्यास केंद्राचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केेले.