उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील ग्रामपंचायतिचे बिगुल वाजले असून सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 247 निवडणूक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 236 अर्ज वैध झाले असून 11 अर्ज अवैध आले आहेत. उरण तालुक्यातील केगाव, नागाव, म्हातवली, चाणजे, फुंडे, वेश्वी अशा ग्रामपंचायतची निवडणूक आहे.
यंदाची लढत भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद पाहता या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
केगाव ग्रामंचायत सदस्य संख्या 13 असून त्यासाठी 41 अर्ज दाखल झाले होते त्यातील 38 अर्ज वैध व तीन अर्ज अवैध झाले. नागाव ग्रामपंचायत सदस्य संख्या 11 असून त्यासाठी 32 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 31 अर्ज वैध व एक अर्ज अवैध झाले. म्हातवली ग्रामपंचायत सदस्य संख्या 11 असून त्यासाठी 28 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 28 अर्ज (सर्वच) वैध झाले चाणजे ग्रामपंचायत सदस्या संख्या 17 असून त्यासाठी 78 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 75 अर्ज वैध व तीन अर्ज अवैध झाले आहेत. फुंडे ग्रामपंचायत सदस्य संख्या नऊ असून त्यासाठी 28 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 25 अर्ज वैध व तीन अर्ज अवैध झाले आहेत. वेश्वी ग्रामपंचायत सदस्य संख्या नऊ असून त्यासाठी 40 अर्ज दाखल झाले असून त्यातील 39 अर्ज वैध व 1 अवैध झाले आहेत.
उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी (दि. 4) दुपारी 3. 00 वाजेपर्यंत मुदत असेल तर दुपारी 3 वाजेनंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात येईल. मतदान शुक्रवारी (दि. 15) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत जिल्हा परिषद शाळेत असेल. मतमोजणी सोमवारी (दि.18) उरण तहसील कार्यालयात होईल, अशी माहिती उरण तहसील कार्यालय येथून देण्यात आली आहे.