Breaking News

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा; सायना नेहवाल, के. श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

बर्मिंघम : वृत्तसंस्था

सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत महिला आणि पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सायनाने डेन्मार्कच्या होमार्कला; तर श्रीकांतने जोनाथन ख्रिस्तीला पराभूत केले.

ऑलिम्पिकची माजी कांस्यपदक विजेती सायनाने लाइन होमार्क जॉर्सफेल्टविरुद्ध रोमहर्षक सामन्यात विजय संपादन केला. सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या सायनाने शानदार कामगिरी करीत सामना 8-21, 21-16,21-13 असा जिंकला. सातव्या मानांकित श्रीकांतने आशियाई चॅम्पियन जोनाथन ख्रिस्ती याला 21-17, 11-21, 21-12 असे पराभूत केले.

बी साईप्रणीतला मात्र दुसर्‍या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. हाँगकाँगच्या लोंग एंगस् याने त्याला 12-21, 17-21 असे पराभूत केले. समीर वर्मा याने पहिला गेम जिंकल्यानंतरही माजी विश्वविजेता आणि जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू व्हिक्टर एक्सलसन याच्याकडून 21-16, 18-21, 14-21ने पराभूत झाला. अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी या जोडीलादेखील शिहो तनाका-कोहारू योनेमोतो या जपानच्या सातव्या मानांकित जोडीकडून 21-23, 17-21ने पराभव पत्करावा लागला.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply