Breaking News

फुंडे विद्यालयात वाजेकर यांची जयंती

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेचे फुंडे येथील वीर तुकाराम हरी वाजेकर विद्यालयात तालुक्यांतील शिक्षण महर्षी वीर तु. ह. वाजेकर यांची 115 वी जयंती बुधवारी (दि. 6) उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मिठागर युनियन कार्यालयातील त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

वीर तु. ह. वाजेकर सामाजिक संस्थेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील व वीर तु. ह. वाजेकर या दोन शिक्षण महर्षींच्या प्रतिमेस स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन कृष्णा कडू, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनिता वर्तक, स्कूल कमिटीचे सदस्य रमाकांत म्हात्रे, वाजेकरांचे नातू ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, मंगेश वाजेकर, विराज वाजेकर, दिलीप कडू पर्यवेक्षक जी. सी. गोडगे, कार्यालयीन अधिक्षक एम. पी. तुमडे, ज्युनिअर कॉलेजचे प्रमुख व्ही. के. कुटेया यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी सांकृतिक विभाग प्रमुख दर्शना माळी, शिक्षक व विद्यार्थी  उपस्थित होते. त्यानंतर कृषी सप्ताहाचे औचित्य साधून वीर वाजेकर माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांणागणात वृक्षारोपण करण्यात आले.

महाविद्यालयातही अभिवादन

उरण : रयत शिक्षण संस्थेचेच्या फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयात उरणचे राजे तु. ह. वाजेकर यांची जयंती बुधवारी (दि. 6) साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांनी प्रतिमा पूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुजाता पाटील यांनी केले. तर प्रा. राम गोसावी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply