Breaking News

छावा प्रतिष्ठानकडून आगीत जळालेली झाडे जगविण्याचे प्रयत्न

उरणच्या इंद्रायणी डोंगर परिसरात वणवा

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील इंद्रायणी डोंगर परिसरात लागलेल्या आगीमुळे अनेक झाडे व नव्याने वृक्षसंवर्धन करण्यात आलेली झाड आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. चिरनेरचे छावा प्रतिष्ठान ही जळालेली झाडे जगविण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रयत्न करत आहेत.

उरणमध्ये सातत्याने लागले जाणारे वा लावले जाणारे वणवे थांबविण्यास कमी मनुष्यबळ असणार्‍या उरण वनविभागाला व येथील जनतेला येणारे अपयश वृक्षसंवर्धनास बाधा ठरत आहे. उरणमध्ये कुठे ना कुठे सातत्याने लागणारे वणवे ही चिंतेची बाब आसून उरणमधील वन संपदा कमी करण्यास हातभार लावीत आहे.

गुरुवारी (दि. 4) लागलेल्या वणव्यामध्ये छावा प्रतिष्ठानने उंच पठारावर लावलेली व गेली 2 वर्ष अथक प्रयत्नाने जागविलेली 80च्यावर झाडे जळाली आहेत. त्याचबरोबर आगोदर जगविलेल्या 200च्यावर कडूनिंबाची झाडे व उपजत आसलेल्या 1000च्या वर झाडांना आगीची झळ लागली आहे. तरीही छावा प्रतिष्ठान सदस्य सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आशाळभूतपणे ती झाड जगविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ताबडतोब त्यांनी 400लीटर पाणी या डोंगरावर वाहून नेवून या झाडांना दिले. त्यापाठीमागे एकच उद्देश जर त्या झाडांचा मूळ जीवंत असेल तर पालवी काढेल.

चांगल्या कामात अडथळे हे ठरलेलेच आहेत. दुख: झाले आहेच, परंतू प्रत्येकाने लक्षात ठेवल पाहिजे निसर्ग हा पृथ्वीतलावरील सजीवांचा आत्मा आहे. प्रत्येकाने त्याचे रक्षण करणे गरजेच आहे. निराश झालो तरी हिम्मत हारलो नाही आहोत. प्रयत्न चालूच राहतील.

-सुभाष कडू, संस्थापक-अध्यक्ष, छावा प्रतिष्ठान, चिरनेर

आमचे गार्ड हे लक्ष ठेवून आहेत, परंतू क्षेत्र खूप मोठे आहे. गार्डची संख्या खूप कमी असल्याने वणवे लावणारे सापडणे कठीण जात आहे. तरीही या भागातील सामाजिक संस्थाही वणवे विझविण्यासाठी आम्हाला चांगले सहकार्य करत आहेत. तसेच वनविभागातर्फे वारंवार जनजागृतीही करत आहोत. तरीही वणवे लावणार्‍यांची खबर आम्हाला द्या. आम्ही त्यांच्यावर सक्त कारवाई करू.

-शशांक कदम, विभागीय वन अधिकारी वनविभाग, उरण

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply