ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ यांचे प्रतिपादन
पनवेल : रामप्रहर वृत्त
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर हा ओबीसी समाजावर अन्याय असेल, असे प्रतिपादन ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ यांनी केले.
शासनाने गेल्या 30 महिन्यांच्या काळात काहीही काम केलेले नाही. समर्पित आयोग तयार करून त्या अंतर्गत त्रिसुत्री तयार करुन कोर्टात दाखल करायला सांगितली होती. एम्पेरिकल डाटा तयार करून तो सादर करायचा होता पण सरकार जर टोलवाटोलवी करत असेल की, हे केंद्र सरकारचे काम आहे तर हा ओबीसी समाजाची फसवणूक आहे असेही भुजबळ म्हणाले. ते पुढे म्हणाले, जर 4 मार्च 2021 ला कोर्टाने निर्णय दिला असेल की समर्पित आयोग तयार करा आणि तो 11 मार्च 2022 ला सादर केला तर एक वर्ष हे सरकार का थांबले होते? म्हणजे ही ओबीसी समाजाची फसवणूक आहे. एक लोकप्रतिनिधी आणि ओबीसी समाजाचा कार्यकर्ता म्हणुन माझी अशी मागणी आहे की, या निवडणुका ओबीसी आरक्षण ठेवूनच घेतल्या पाहिजेत.