Breaking News

खांदा कॉलनीमध्ये रक्दान शिबिर व ई-श्रम महानोंदणी अभियान

उपमहापौर सीताताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्यसाधून खांदा कॉलनीमध्ये रक्तदान शिबिर आणि नगरसेवक निधीमधून करण्यात आलेल्या कामांचे लोकार्पण आणि ई-श्रम महानोंदणी अभियानाचे आयोजन रविवारी (दि. 8) करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन, ओपन जिमचे लोकार्पण व बेंच आणि डस्टबिनचे वाटप सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले.

पनवेल महापालिकेच्या कार्यतत्पर आणि कार्यकुशल उपमहापौर सीताताई पाटील यांनी वाढदिवसानिमित्त खांदा कॉलनीमधील शंकर मंदिराजवळ भव्य रक्तदान शिबिर आणि विविध योजनांच्या महानोंदणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिराला नगरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला, तसेच वाढदिवसानिमित्त सीताताई पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून उभारण्यात आलेल्या ओपन जीमचे उद्घाटन, बेंचेंस व डस्टबिनचे वाटप यावेळी करणयात आले. पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या कार्यक्रमांचे उद्घाटन आणि लोकार्पण झाले.

या सोहळ्याला पनवेल शहर अध्यक्ष जयंत  पगडे, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, वंदे मातरम् कामगार संघटनेचे सरचिटणीस मोतीराम कोळी, खांदा कॉलनी शहर युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी, पनवेल तालुका प्रधान मंत्री जनकल्याण योजना अध्यक्ष रोहित कोळी, युवा मोर्चा सरचिटणीस सिद्धेश खानावकर, मनीषा पाटील, डॉ संतोष आगलावे, जेष्ठ नेते सदानंद पाटील, प्रसाद म्हात्रे, बबन बारगजे, स्नेहा पंडित, सूर्यकांत पाटील, गीता रावल, आदेश पाटील, श्वेता म्हात्रे, दुर्वा रावल, यतीन रावल, पोलिस अधिकारी अंकुश खेडकर, कामगार आघाडी संघटनेचे शैलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply