खोपोली : प्रतिनिधी
आदिवासी सप्तसूत्री व कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत माडप येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खालापूर तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून आदिवासी महिलांसाठी दाखले वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिबिराची सुरुवात करण्यात आली. लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा पाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली या वेळी आदिवासी महिलांची रुटिंग तपासणी करण्यात आली. यामध्ये असंसर्गजन्य आजारांचे निदान व उपचार करण्यात आले तसेच खालापूर तहसील कार्यालयाच्या वतीने मंडळ अधिकारी तुषार कामत यांच्या मार्गदर्शनाखाली जातीचे दाखले, वयाचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रेशनकार्डमध्ये नावे टाकणे तसेच नवीन रेशन कार्ड देण्यात आले. पंचायत समितीचे माजी उपसभापती विश्वनाथ पाटील, कृषी अधिकारी नितीन महाडिक, महिला व बालविकास प्रकल्पाच्या सुजाता सकपाळ, तानाजी ढाकवळ, नितीन पाटील, नितीन ठाकूर, शारदा वाघमारे, डॉ. अभिजित झुरे, आरोग्य निरीक्षक गजानन बडदडे, धर्मा भस्मा, औषध निर्माण अधिकारी सोनाली गाढे, आरोग्यसेविका माधुरी म्हात्रे, लॅब टेक्निशियन दीपाली बांदल, दिनेश पाटील, संजय गांधी निराधार अव्वल कारकून सचिन वाघ, महसूल सहाय्यक रविकांत वाघपैजे, पुरवठा अधिकारी रवी सोनकांबळे, पोलीस पाटील रेणुका पाटील, ग्रामसेवक अजय फोफेरकर, ग्रामदक्षता कमिटी सदस्य कमलाकर पाटील, नथुराम कांगे, रवी पाटील, गणेश मालकर यांच्यासह आदिवासी महिला या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.