Breaking News

कबड्डी स्पर्धेत पाले खुर्द संघ विजेता

माणगाव : प्रतिनिधी
येथील नगरपंचायत हद्दीतील महाराणा प्रताप नगरच्या वतीने आयोजित माजी आमदार तथा लोकनेते स्व. अशोकदादा साबळे स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेत पाले खुर्द कबड्डी संघाने पन्हळघर संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत माणगाव तालुक्यातील 32 संघानी सहभाग घेतला होता.
तृतीय क्रमांक उंबर्डी संघाने, तर चतुर्थ क्रमांक यजमान महाराणा प्रताप नगर संघाने मिळविले. विजेत्या चारही संघांना बक्षीस देण्यात आले. वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट चढाईपटू म्हणून नितेश (उंबर्डी), उत्कृष्ट बचावपटू व पब्लिक हिरो (अष्टपैलू खेळाडू) अमन शिंदे (पन्हळघर) यांना गौरविण्यात आले. पंच निलेश साळवी व केतन भिंगारे यांनी भूमिका बजावली.
स्पर्धेचे उदघाटन व बक्षीस जि.प.चे माजी सभापती अ‍ॅड. राजीव साबळे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख अ‍ॅड. महेंद्र मानकर, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील पवार, नगरसेवक कपिल गायकवाड, दिनेश रातवडकर, हेमंत शेट, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण पवार, उद्योजक विरेश येरुणकर, माजी नगरसेवक नितीन बामगुडे, मारवत पवार आदी उपस्थित होते.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply