Breaking News

रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून 50च्या आसपास असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 83वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

जानेवारी महिन्यात आलेली कोरोनाची लाट फेब्रुवारी महिन्यात ओसरण्यास सुरुवात झाली होती. मार्च महिन्यानंतर रुग्णवाढीचा दर शुन्य टक्क्यावर आला. त्यामुळे निर्बंध उठविण्यात आलेे, पण त्यानंतर कोरोनाविषयक नियमांच्या पालनाचा नागरिकांना विसर पडल्याचे चित्र दिसत आहे.

गेले दोन महिने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या स्थिर होती. साधारणपणे सक्रिय रुग्णांची संख्या 50च्या आसपास होती. आता मात्र यात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पनवेल, उरण, मुरूड माणगाव या तालुक्यांत कोरोना पुन्हा बळावत असल्याचे दिसून येत आहे. पनवेल तालुक्यात 47 (महापालिका हद्दीत 42 आणि ग्रामीण पाच रुग्ण) त्याखालोखाल मुरूड येथे 12, उरण आठ, माणगाव व म्हसळा येथे प्रत्येकी चार, अलिबाग तीन, सुधागड दोन आणि खालापूर व पेणमध्ये प्रत्येकी एक अशा एकून 82 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

पुन्हा सुरू झालेली रुग्णवाढ ही चिंतेची बाब असली तरी उपचाराधीन रुग्णांपैकी एकालाही रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली नाही ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात आजवर दोन लाख 15 हजार 423 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यापैकी दोन लाख 10 हजार 643 जण उपचारानंतर पूर्ण बरे झाले, तर चार हजार 698 जणांचा मृत्यू झाला आहे.

लसीकरणाचे प्रमाण उत्तम

जिल्ह्यात 22 लाख पाच हजार 210 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस, 20 लाख 83 हजार 438 जणांनी दुसरा, तर 58 हजार 232 जणांनी तिसरा डोस (प्रिकॉशनरी/बूस्टर) घेतला आहे. जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण 95 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply