Breaking News

पनवेलमध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक 2022 रबर बॉल स्पर्धा मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात दोन दिवस आयोजित करण्यात आली आहे. या क्रिकेट

स्पर्धेच्या रायगड प्रिमीअर लीगच्या संकेतस्थळाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 4) भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले.

अल्पावधीतच नालौकीक मिळवलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा रायगड प्रिमीअर लीगच्या तिसर्‍या पर्वाला सुरुवात होत आहे. त्याअंतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक 2022 या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळीच रायगड प्रिमीअर लीगच्या फॉर्म रजिस्ट्रेशन व संकेतस्थळाचे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यासोबतच आमदार चषक 200 रबर बॉल या स्पर्धेचे आयोजन माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, प्रशांत कर्पे, सुमित झुंझारराव यांनी केले असून मिडल क्लास हौंसिंग सोसायटीच्या मैदानावर ही स्पर्धा दोन दिवस सुरू राहणार आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला 50 हजार रुपये सन्मानचिन्ह भव्य चषक व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला सन्मानचिन्ह आणि भव्य चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या आणि संकेतस्थळाच्या उद्घाटनावेळी पनवेल महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, उद्योजक व मिडल क्लास सोसायटीचे अध्यक्ष राजू गुप्ते, विलास कोठारी, राकेश गायकवाड, योगेश लहाणे, उल्हास झुंझारराव, नदीम मेमर आदींसह खेळाडू उपस्थित होते.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply