अलिबाग (प्रतिनिधी) :
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने रायगड क्रिकेट स्पोर्टस आणि वेल्फेअर असोसिएशन यांच्यातर्फे महिलांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आदिती अभिराज दळवी यांच्या अध्यक्षतेखाली 24 ते 30 मे या कालावधीत पनवेल येथे शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरात रायगड जिल्ह्यातील सर्व गटांमधील महिलांना प्रवेश दिला जाईल. नवा नोंदविण्याची अंतिम तारीख 23 मे आहे. या शिबीरात तज्ज्ञ मार्गदर्शक खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. शिबीरात सहभागी होणार्या खेळाडूंधून महिलांचे विविध गटांचे संघ निवडण्यात येतील. त्यांचे सराव सामने खेळविण्यात येणार आहेत. हे प्रशिक्षण शिबीर यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष आदिती अभिराज दळवी, संदीप पाटील, विनय पाटील, सुहास हिरवे, सुमीत झुंजारराव, प्रितम कय्या, महेश देशमुख परिश्रम घेत आहेत. अधिक माहितीसाठी सुहास हिरवे 7208185613, किरीट पाटील 8869789385, प्रितम कय्या 9322243534 यांच्यांशी संपर्क साधावा.