महाड : प्रतिनिधी
शहरातील राधिका लॉजवर शुक्रवारी रात्री पोलिसांनी केलेल्या तपासणीत एकाकडे जवळपास पाचशे सुरे सापडले. त्याला अटक करण्यात आली आहे. ऐन निवडणूक काळात हा शस्त्रसाठा सापडल्याने त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे पोलिसांकडून सर्वत्र नाकाबंदी असून, या अंतर्गत महाड शहरात शुक्रवारी रात्री तपासणी केली जात असताना राधिका लॉजवर बाबनसिंग सोनुसिंग टाक (रा. निपाणी, बेळगाव-कर्नाटक) या व्यक्तीकडे 510 सुरे आढळले. पाच गोणींमध्ये हे सुरे होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत असलेला इसम हा चाकू-सुरे विक्रेता असावा, असा संशय पोलिसांना असून, त्यादृष्टीने अधिक तपास सुरू आहे.