पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांच्या मातोश्री शालिनी महादेव कोळी यांचे सोमवारी (दि. 8) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 73 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती महादेव कोळी, तीन विवाहित मुले सुभाष, अविनाश, नंदू, विवाहित मुलगी सुषमा, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शालिनी कोळी यांच्या पार्थिवावर पनवेल येथील कोळीवाडा स्मशानभूमीत फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेस महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शालिनी कोळी यांच्या निधनाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी पालकमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
Check Also
निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक
आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …
RamPrahar – The Panvel Daily Paper