Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली खारघरमधील नालेसफाईबाबत आढावा बैठक

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघरमधील नालेसफाईबाबत पनवेल महानगरपालिकेत खारघरमधील नगरसेवक, पदाधिकारी, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेशजी ठाकूर यांच्या उपस्थितीत सभागृह नेते श्री परेशजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक गुरुवारी (दि. 26) झाली.

या बैठकीमध्ये सभागृह नेते श्री परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती संजना कदम, भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, युवा नेते समीर कदम, मंडल उपाध्यक्ष दिलीप जाधव, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. विधाते व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

पावसाळ्याच्या तोंडावर सिडकोने नालेसफाई व गटारसफाई ही पनवेल महानगरपालिकेची कामे आहेत असे कळवित हात झटकले, असे कळताच खारघरमधील नगरसेवकांनी हा विषय महत्त्वाचा असल्याने प्रथम प्राथमिकतेने करा, अशी आग्रही मागणी केली. पनवेल महानगरपालिकेने ही संयुक्त सर्वेक्षण करून तातडीने नालेसफाईच्या कामास सुरूवात केली असून खारघर प्रमुख नाल्यांची सफाई चालू करण्यात आली आहे.

सिडकोने गेल्या वर्षात नालेसफाई व रेनवॉटर गटारांची थातुरमातुर सफाई करण्याचा देखावा केला आहे. पावसाळ्यापूर्वी सफाईचे अवघड काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे, पण पनवेल महानगरपालिकेने हे आव्हान स्वीकारत ज्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते त्या भागातील अडथळे प्रथम बाजूला करून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल यासाठी युध्द पातळीवर कामास सुरुवात केली आहे, असे उपस्थित पालिका अधिकार्‍यांनी सांगितले. काही सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचते ते पंपाद्वारे उपसण्याचे नियोजन पालिका करीत आहे.

नालेसफाईबाबत सभागृह नेते परेश ठाकूर विशेष आग्रही असून ते स्वतः होणार्‍या प्रगतीविषयी वेळोवेळी पाहणी करणार आहेत. येत्या पावसाळ्यात खारघरवासीयांना कमीत कमी त्रास होईल यासाठी खारघरमधील सर्व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक प्रयत्नशील राहणार आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply