लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस येत्या 2 जूनला साजरा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार न्हावेखाडी-उत्तर पाडा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी उत्तरपाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून मोफत भव्य महा आरोय शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना तपासणी केली तसेच त्यांना मार्गदर्शन केले. या शिबिराचा लाभ परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला. या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, न्हावेच्या उपसरपंच मंजुषा ठाकूर, माजी उपसरपंच सागरशेठ ठाकूर, शिबिराचे संयोजक तथा भाजप नेते सी. एल. ठाकूर, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुणशेठ ठाकूर, गोपिचंद ठाकूर, अनंत कडू, तुकाराम मोकल, प्रदीप मोकल, सतीश ठाकूर, सुजित ठाकूर, अनंत ठाकूर, हिराजी ठाकूर, चंद्रकांत मोकल, प्रवीण कालबागे, डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे डॉ. श्याम मोरे, यांच्यासह पदाधिकारी आणि डॉक्टर उपस्थित होते.