Wednesday , February 8 2023
Breaking News

पनवेल महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत 31% मतदान

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’च्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 9) मतदान प्रक्रिया झाली. 31.03 टक्के मतदान झाले. शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी (दि. 10) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी होऊन दुपारपर्यंत निकाल लागणे अपेक्षित आहे.
नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत असल्याने कै. लोंढे यांच्या कन्या रूचिता यांना भाजप-रिपाइं युतीतर्फे उमेदवारी देण्यात आली. या पोटनिवडणुकीसाठी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेत्या शकुंतला ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, उमेदवार रूचिता लोंढे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी 7.30 वाजता 34 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सरतेशेवटी 31.03 टक्के मतदान नोंदविण्यात आले. एकूण 28,350 पैकी 8797 मतदारांनी मतदान केले. यात 4939 पुरुष व 3858 महिला मतदारांचा समावेश आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply