Breaking News

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बुधवारी उलवे नोडमध्ये

भगवान श्री व्यंकटेश्वर मंदिराचा भूमिपूजन सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त
देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती उलवे नोडमध्ये साकारणार आहे. सेक्टर 12, प्लॉट नं. 3 येथे उभारल्या जाणार्‍या या भगवान श्री व्यंकटेश्वर मंदिराचा भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 7) सकाळी 6.30 वाजता होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याला राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तिरुमला तिरुपती देवस्थानचे चेअरमन वाय. व्ही. सुब्बा रेड्डी, रेमंड लि.चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तिरुमला तिरुपती देवस्थान बोर्डातर्फे देशात हैदराबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगळुरू, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरूक्षेत्र व ऋषिकेश या ठिकाणी शहर पातळीवरील सुविधा म्हणून श्री व्यंकटेश्वर मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. याच धर्तीवर आता उलवे नोडमध्येही व्यंकटेश्वराचे मंदिर उभारले जात आहे. हे मंदिर भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे त्या परिसराला धार्मिक व सामाजिक महत्त्व प्राप्त होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. याशिवाय देवस्थानामार्फत परिसरात अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply