Breaking News

बारापाडा येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधी अंतर्गत मतदार संघातील बारापाडा आणि बानूबाईची वाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 28) झाले. विकासाची गंगा प्रत्येक गावात पोहचली पाहिजे आणि नागरिकांना त्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, या हेतूनेच उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी हे काम करीत आहेत. त्या अनुषंगाने विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते  बारापाडा येथे करण्यात आले.

बारापाडा येथील आगरीपाडा येथे 14 लाख 86 हजार 337 रुपयांचे सभागृह, बानू बाई वाडी येथे चार लाख 99 हजार 840 रुपयांचे रस्त्याचे काँक्रिटीकरण, नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्तीसाठी दोन लाख 99 हजारांच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. या वेळी आमदार महेश बालदी यांनी उपस्थितांना संबोधित केले.

विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारून विकास होत नसतो तर त्याला कर्तव्यदक्ष आमदार मतदार संघात लागतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी या वेळी केले. ते पुढे म्हणाले जेव्हापासून उरण मतदार संघात महेश बालदी हे आमदार झाले तेव्हापासून या मतदार संघात विकासाचा झंझावत पाहिला मिळत आहे.

भूमिपूजन सोहळ्याला ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, केळवणे जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी सरपंच राजू पाटील,  कर्नाळा विभागीय अध्यक्ष चंद्रकांत पाटील, दिघाटी सरपंच अमित पाटील, माजी उपसरपंच विद्याधर जोशी, लक्ष्मण गावंड, गोपाल गावंड, उमेश पाटील, कमलाकर पाटील, हरिभाऊ पाटील, दिलीप गावंड, शांताराम वाघमारे, संतोष हापसे, ग्रामपंचायत सदस्य तुलसाबाई हापसे, रामदास वाघमारे, रत्नाकर घरत, अखलाक बडे, फैयाज दाखवे, तुकाराम पाटील, कर्नाळा विभागीय उपाध्यक्ष दीपक पाटील, सुरेश वाघमारे, बाबुराव वाघमारे, मुनाफ रासळकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण आणि पनवेल या मतदारसंघाचा चेहरा बदलण्याचे काम आम्ही दोन्हीही आमदार करतोय. -आमदार महेश बालदी

Check Also

पनवेलमध्ये गुरुवारी ’संदीप वैभव…आणि कविता’

कुसुमाग्रज जयंती व मराठी राजभाषा गौरव दिननिमित्त कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तज्येष्ठ कवी विष्णू वामन …

Leave a Reply