पनवेल ः वार्ताहर
भारतीय जनता पार्टीचे युवानेते गौरव कांडपीळे यांचा वाढदिवस शनिवारी विविध सामजिक कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमीत्त नवीन पनवेल सेक्टर 15 येथील चेंबूर नागरी बँकेसमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते करण्यात असून, या शिबिरास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत गौरव कांडपीळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपीळे, माजी उपमहापौर चारूशीला घरत, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका सुशीला घरत, भाजपनेते अजय कांडपीळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.