पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या 2 जूनला 71वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने रविवारी (दि. 29) नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या नगरसेवक निधीमधून खांदा कॉलनी येथील सोसायट्यांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले.
छोटेखानी झालेल्या या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, खांदा कॉलनी युवा मोर्चा, अभिषेक भोपी, शांताराम महाडिक, रामनाथ पाटील, सचिन गायकवाड, जितेंद्र माने, संतोष लोटनकर, खांदा कॉलनी महिला मोर्चा अध्यक्ष राखी पितळे, सरचिटणीस आशा मुंडे, मनीषा पाटील आदी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.