पनवेल : प्रतिनिधी
रायगड जिल्हा जलतरण संघटना व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 11) उलवा नोडमध्ये रायगड जिल्हास्तरीय कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद व निवड चाचणी 2019 स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणारी ही स्पर्धा 15 ते 17, 12 ते 14, 9 ते 10 आणि 11 वर्षाखालील मुले व मुली अशा गटात होणार आहे. ग्रुप 1 व 2 मध्ये फ्रीस्टाईल 50, 100, 200, 400, 800 आणि 1500 मीटर, बॅक स्ट्रोक 50, 100 व 200 मीटर, ब्रेस्ट स्ट्रोक 50, 100 व 200 मीटर, बटरफ्लाय स्ट्रोक 50, 100 व 200 मीटर, इंडिव्हिज्युल मिडले 200 व 400 मीटर, फ्री स्टाईल रिले 4 बाय 100 मीटर व 4 बाय 200 मीटर, मिडले रिले 4 बाय 100 मीटर, ग्रुप 03 मध्ये फ्री स्टाईल 50, 100 व 200 मीटर, बॅक स्ट्रोक 50 व 100 मीटर, ब्रेस्ट स्ट्रोक 50 व 100 मीटर, बटरफ्लाय स्ट्रोक 50 व 100 मीटर, इंडिव्हिज्युल मिडले 200 मीटर, फ्री स्टाईल रिले 4 बाय 50 मीटर, मिडले रिले 4 बाय 50 मीटर, ग्रुप 04 मध्ये बॅक स्ट्रोक 50 व 100 मीटर, ब्रेस्ट स्ट्रोक 50 मीटर, बटरफ्लाय स्ट्रोक 50 मीटर, इंडिव्हिज्युल मिडले 200 मीटर, फ्री स्टाईल रिले 4 बाय 50 मीटर, मिडले रिले 4 बाय 50 मीटर अशा प्रकारात स्पर्धा होणार असून वॉटर पोलो स्पर्धाही होणार आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्या खेळाडूंची राज्यस्तरावर निवड होणार आहे. या स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी केले आहे.