Breaking News

शिवरायांचा आदर्श घेऊन सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे -प्रमोद कदम

नागोठणे : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अठरापगड जातीचे लोक होते. महाराज त्या सर्वांना आदराची आणि आपुलकीची वागणूक देत होते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी गुण्यागोविंदाने व एकोप्याने नांदावे, असे प्रतिपादन नागोठणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद कदम यांनी शनिवारी बेणसे येथे केले.

बौद्धजन समाज सेवा संघ, सम्यक सामाजिक संस्था, रमाई महिला मंडळ, सावित्री बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी बेणसे (नागोठणे) येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमोद कदम बोलत होते.

बेणसे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अ. का. म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरूवातीला त्रिसरण पंचशीलेचे ग्रहण करून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. अ. का. म्हात्रे, चंद्रकांत अडसुळे, बबन अडसुळे, अविनाश अडसुळे, वैजयंती भगत, सुनिधी अडसुळे, कविता संतोष अडसुळे, आम्रपाली सावंत, अमृता शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित अडसुळे यांनी केले. उपसरपंच संतोष अडसुळे, सामाजिक कार्यकर्ते गजानन कुथे, विनोद इंद्रे, सुनील वेदक, भास्कर पाटील, हरेश वातेरे, सोमनाथ भऊड यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्या व ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते. भावेश भगत यांनी आभार मानले.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply