खोपोली ः प्रतिनिधी
भाजप युवा मोर्चा खोपोली शहराध्यक्ष डॉ. निकेत अनंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खालापूर तालुक्यातील ताकई येथील श्री विठोबा देवस्थान मंदिर सभागृहात आरोग्य महाशिबिराचे आयोजन रविवारी (दि. 25) करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी डॉ. पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल युवा मोर्चाचे कौतुक केले.
या आरोग्य शिबिरास माजी आमदार सुरेश लाड, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जि.प.चे माजी आरोग्य सभापती नरेश पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, खोपोली मंडळ अध्यक्ष रमेश रेटरेकर, हेमंत नांदे, अॅड. रामदास पाटील, काळूराम पाटील, संदीप पाटील, डॉ. हेमंत पाटील, अनंत पाटील, रमाकांत पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्री विठोबा देवस्थानचे अध्यक्ष अनंत गोविंद पाटील यांनी केले.
या शिबिराचा 342 लोकांनी लाभ घेतला. शिबिरामध्ये नेत्र तपासणी, हाडाची घनता तपासणी, हृदयरोग तपासणी, ईसीजी, कान, नाक तपासणी, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, कर्करोग तपासणी अशा विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या व औषधांचे वाटप करण्यात आले.
शिबिरासाठी ए.जी. पाटील मेडिकल फाउंडेशन व संजीवनी हॉस्पिटल खोपोली तसेच रायगड हॉस्पिटल कर्जत यांनी योगदान दिले, तर शिबिर यशस्वीतेसाठी डॉ. हेमंत पाटील, डॉ. निकेत पाटील, डॉ. रोहिणी पाटील, डॉ. तृप्ती पाटील, डॉ. सरोज काळे आदी डॉक्टरांनी योगदान दिले.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …