पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष, जागतिक महिला दिन आणि आणि स्व. नगरसेविका मुग्धा गुरूनाथ लोंढे यांच्या स्मरणार्थ क्रांतीचा जयजयकार या कीर्तन सप्ताहाचे आयोजन लोंढे कुटूंबीयांकडून करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 3) झाले.
पनवेल शहरातील विरूपाक्ष मंदिरात होत असलेल्या या कीर्तन सप्ताहाचे पहिले पुष्प पेेण येथील ह.भ.प. अथर्व घाटे यांनी सादर केले. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, गुरूनाथ लोंढे, नगरसेविका रूचिता लोंढे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, नंदकुमार कर्वे, आदित्य उपाध्ये आदी उपस्थित होते. या वेळी लोंढे कुटुंबीयांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कीर्तन सप्ताह 9 मार्चपर्यंत चालणार आहे.
Check Also
उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …