उरण : वार्ताहर, बातमीदार
चाईल्ड केअर सामाजिक संस्था, उरण रायगड आणि सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्वी आदिवासी बांधवाना सिया जयप्रकाश पाटील हिच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्त अन्नधान्य व सामानाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक पाटील, नवघर ग्रामस्त मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील, चाईल्ड केअर संस्थेचे अध्यक्ष विकास कडू, नवघर ग्रामपंचायतीच्या सदस्य मयुरी पाटील, वेश्वी आदिवासी शाळेचे मुख्याध्यापक रमणिक म्हात्रे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम उत्तमरित्या पार पडण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष विक्रांत कडू, कार्याध्यक्ष ह्रितिक पाटील, खजिनदार हर्षद शिंदे उपाध्यक्ष मनोज ठाकूर, सदस्य विपुल कडू, रोशन धुमाळ आणि विवेक कडू आदींनी मेहनत घेतली.