मोहोपाडा : प्रतिनिधी
इंदेमित्सु ल्युब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सायकल रॅली व वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पनवेल ते रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी परिसरातील जांभिवली सायकल अशी सायकल रॅली काढण्यात आली. या वेळी जांभिवली येथे रॅली आल्यानंतर जांभिवली ग्रामपंचायत आवारात वृक्ष लागवड करण्यात आले. या कार्यकम अंतर्गत एकूण 750 विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
इंदेमित्सु ल्युब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हा भारतातील अग्रगण्य ऑटो मोबाईल ल्युब्रीकंट तयार व पुरवठा करणारी जापनीज कंपनी असून सीएसआर अंतर्गत येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी सांगली यांच्या माध्यमातून पनवेल ते जांभिवली सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमध्ये जवळपास साठ सायकलस्वार सहभागी झाले होत. या वेळी इदेमित्सुचे सिनिअर मॅनेजर भूषण दामले म्हणाले की, इदेमित्सु ल्युब इंडियामार्फत आपण कार्यक्रम नियोजीत करत असताना पर्यावरण पूरक व पर्यावरण संरक्षण या आधारित कार्यक्रम नियोजित केले पाहिजे व झिरो वेस्टेज अमंलात आणले पाहिजे. या धोरणावर इंदेमित्सु कंपनी काम करीत आहे. त्याच बरोबर कंपनीचे कर्मचारी व उद्योजक यांना कापडी पिशव्या वाटप करण्यात येतात.
येरळाचे प्रकल्प संचालक श्रीपाल सप्तसागर या वेळी म्हणाले, येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी सांगली गेली 44 वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहे. त्यामध्ये इदेमित्सु ल्युब इंडिया व येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी गेले तीन वर्ष पाताळगंगा एमआईडीसी हद्दीत पेहचान प्रोजेक्ट राबवीत आहेत. या मध्ये गरोदर व स्तनदा माता 0 ते 12 महिन्यापर्यंतच्या मुलांना सकस आहार साहित्य पुरविले जेणेकरून कुपोषणाचे प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून पशिक्षण घेतलेल्या महिला घर बसल्या स्वतः चा उद्योग व्यवसाय करू शकतील.
या वेळी प्रमुख पाहुणे सरपंच रिया कोंडीलकर, उपसरपंच मनोहर कोंडीलकर, सिनिअर मॅनेजर भूषण दामले, श्रीपाल सप्तसागर, संचालक येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी. नैनेश मेहता, उपाध्यक्ष इदेमित्सु ल्युब इंडिया, तसेच इदेमित्सुचे पदाधिकारी यांच्याहस्ते गरोदर व स्तनदा मातांना सकस आहार किटचे वाटप करण्यात आले. अश्याप्रकारे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक देवदास झेंडे यांनी केले व आभार ज्योस्त्ना देशमुख यांनी मानले.