Breaking News

पावसाच्या आगमनाने खोपोलीच्या आठवडा बाजारात दाणादाण

खोपोली : प्रतिनिधी

येणार, येणार म्हणून हुलकावणी देणार्‍या मोसमी पावसाने गुरुवारी (दि. 9) विजेच्या कडकडाटासह खोपोलीत जोरदार एन्ट्री केली.

दर गुरुवारी खोपोली बाजारपेठेत आठवडा बाजार असतो, खेड्यापाड्यातील नागरिक तसेच आदिवासी बांधव या बाजारात खरेदीसाठी येत असतात.  गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या पावसाने आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या परिसरातील ग्रामस्थांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली.

शाळा सुरू होत असल्याने मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य दप्तर व इतर खरेदीसाठी पालक बाजारात आले होते. पण पावसामुळे त्यांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी पडले. खरेदीसाठी आलेल्या ग्रामस्थांना दुकानांच्या आडोशाचा आधार घ्यावा लागला.

या पावसाचे बच्चेकंपनीने स्वागत केले त्यांनी उत्साहाच्या भरात पावसात भिजने पसंत केले. व्यापारी वर्गात मात्र नाराजीचा सूर उमटला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply