Saturday , December 3 2022

कुंडेवहाळमध्ये काँक्रीट रस्त्याचा शुभारंभ

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त
उरणचे आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून कुंडेवहाळ बस स्टॉपपासून ते कुंडेवहाळ गावापर्यंत जाणारा रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. हे काम 20 लाख रुपयांचा निधी वापरण्यात आला असून या रस्त्याचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, कुंडेवहाळ ग्रामपंचायत सरपंच सदाशिव वासकर, उपसरपंच ऋषिकेश वासकर, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी, राम पाटील, सचिन पाटील, राकेश गायकवाड, दत्तात्रेय पाटील, विनोद भोईर, ग्रामपंचायत सदस्य जागृती वासकर, संगीत वासकर, करिष्मा वासकर, वंदना पाटील, भारती भोईर, यशोदा कातकरी, रेवन पाटील, नामदेव भोईर, आर. आर. वासकर, प्रीती वासकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवस हा विविध उपक्रमांनी साजरा
करण्यात आला.

Check Also

सीकेटी महाविद्यालयात एचआयव्ही एड्सविषयी जनजागृती कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स …

Leave a Reply