Breaking News

उरण, पेण पालिकेच्या विविध सभापतींची निवड

उरण : वार्ताहर

येथील नगर परिषदेच्या स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या सभापतींची बुधवारी (दि. 18) बिनविरोध निवड झाली. पालिका सभागृहात झालेल्या या निवडीवेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हा अधिकारी अश्विनी पाटील यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सहकार्य केले.

पदसिद्ध असलेल्या स्थायी समिती सभापतिपदी नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम सभापतिपदी उपनगराध्यक्ष जयेंद्र लक्ष्मण कोळी, तसेच शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापतिपदी रवी यशवंत भोईर, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य सभापतिपदी रजनी सुनील कोळी, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण सभापतिपदी धनंजय लक्ष्मण कडवे, नियोजन व विकास सभापतिपदी जान्हवी लोकेश पंडित आणि महिला व बालकल्याण सभापतिपदी स्नेहल भीमदास कासारे यांची बिनविरोध निवड झाली.

या वेळी नगरसेवक कौशिक शहा, राजेश ठाकूर, नंदकुमार लांबे, मेराज शेख, नगरसेविका प्रियंका पाटील, दमयंती म्हात्रे, यास्मिन गॅस, आशा शेलार, भाजप तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, उद्योजक राजेंद्र पडते, मदन कोळी आदी उपस्थित होते. त्यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

…………………………………………………………………

पेण : प्रतिनिधी

येथील नगर परिषदेच्या स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड बुधवारी (दि. 18) झाली. उरणप्रमाणेच पेणमध्येही सर्व समित्यांच्या सभापतिपदांवर सत्ताधार्‍यांचे वर्चस्व दिसून आले.

पालिकेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया झाली. या वेळी बांधकाम सभापतिपदी राजेश तुकाराम म्हात्रे, कर व शुल्क सभापतिपदी निवृत्ती भास्कर पाटील, महिला व बालकल्याण सभापतिपदी तेजस्विनी नेने, तर शिक्षण, क्रीडा व पाणीपुरवठा सभापतिपदी दर्शन बाफना यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. याशिवाय स्थायी समितीवर नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, गटनेते अनिरुद्ध पाटील यांची निवड

झाली आहे.

या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी अर्चना दिवे, सामान्य प्रशासन अधिकारी राजाराम नरूटे, भरत निंबरे यांनी सहकार्य केले.

माजी उपनगराध्यक्ष दीपक गुरव, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, उपाध्यक्ष अजय क्षीरसागर, अ‍ॅड. मंगेश नेने आदींनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply