Breaking News

पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी

उरण : वार्ताहर

उरणमध्ये वटपौर्णिमा हा सण महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरातील देऊळवाडी, कोट नाका, राघोबा देव मंदिर समोर, बोरी नाका, द्वारका नगरी, मोरा कोळीवाडा, साई बाबा मंदिर जवळ, केगाव, नागाव, चिरनेर, जासई आदी ठिकाणी महिलांनी वट वृक्षाची यथासांग पूजा केली. देऊळवाडी येथे नंदु कुमार उपाध्ये या भटजींनी वटपौर्णिमेची यथा सांग पूजा सांगितली. महिलांनीही वट वृक्षाची पूजा करून एकमेकींना हळद-कुंकू देऊन एकमेकींना वाण म्हणून फणसाचे गरे, आंबा, जांभळे, करवंदे, केळी अशी पाच फळे देऊन एकमेकींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply