Breaking News

12व्या वर्षीच मॅट्रीक पास! खारघरमधील विद्यार्थ्याची कमाल; 62 टक्के गुण

पनवेल : रामप्रहर वृत्त
खारघर येथील एका 12 वर्षीय मुलाने चक्क दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. सहजप्रीत सिंह असे या मुलाचे नाव असून तो दहावीत 62 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. दहावीत यश मिळवणारा सहजप्रीत हा राज्यातील सर्वांत कमी वयाचा मुलगा ठरला आहे.
सहजप्रीत हा खारघरच्या केपीसी शाळेत शिकतो. एप्रिलमध्ये दहावीची परीक्षा संपल्यानंतर लगेचच सहजप्रीतने अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमाचीही तयारी सुरू केली आहे. त्याला आयआयटीमधून बीटेक करायचे आहे.
सहजप्रीतचे वडील गुरुशरण यांनी मुलाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, गेल्या वर्षी मथुरेहून नवी मुंबईत आल्यावर सहजप्रीतला दहावीला प्रवेश मिळणे अवघड झाले होते. इथे शाळेत प्रवेश घेण्यासाठी आम्हाला बरीच भटकंती करावी लागली. त्यानंतर आम्ही शिक्षण विभागाशी संपर्क साधला आणि अखेर सहजप्रीतला दहावीत प्रवेश देण्याची परवानगी मिळाली.
साधारणपणे नियमित किंवा खाजगी विद्यार्थी म्हणून एसएससी परीक्षेत बसण्यासाठी विद्यार्थ्याचे वय 14 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. याबाबत मुंबई विभागीय मंडळाचे सचिव एस. आर. बोरसे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मी या विद्यार्थ्याबद्दल ऐकले नाही, मात्र त्याने दहावीच्या परीक्षेला बसण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष विनंती मिळवली होती.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply