Breaking News

बिरवाडी नदीपात्रात आरटी-पीसीआर टेस्ट किटचे साहित्य

महाड : प्रतिनिधी

तालुक्यातील बिरवाडी तर्फे कांबळे येथील स्मशानभूमीजवळ असणार्‍या नदीपात्रात कोविड टेस्ट करण्यासाठी लागणारे आरटी-पीसीआर टेस्ट किटच्या वस्तू आढळून आल्या. त्याचे वृत्त समजताच एमआयडीसी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सोनावणे यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. आरटी-पीसीआर टेस्ट किट व इतर वस्तूचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले.

वारंवार होणार्‍या वायू, जल प्रदुषण यापासून उद्भवणार्‍या आजारांना स्थानिक नागरिक बळी पडत असतानासुद्धा अधिकार्‍यांना काही देणेघेणे नाही नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळणार्‍या कारखाने व अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply