केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अग्निपथ योजनेत होणार्या मंत्रालयांतर्गत भरतीमध्ये अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच अग्निपथ योजनेची घोषणा केली, परंतु काही ठिकाणी अग्निपथ योजनेचा माहिती न घेताच विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत तिन्ही सैन्य दल प्रमुखांची बैठक झाली. यानंतर मंत्रालय खात्यांतर्गत होणार्या भरतीत अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आम्ही अग्निपथ योजनेवर जवळपास दीड वर्षे काम केले. भारतीय लष्करातील मानव संसाधन व्यवस्थापनातील हे सर्वांत मोठे परिवर्तन आहे. योजनेची चुकीची माहिती आणि गैरसमजामुळे यास विरोध होत आहे.
-अॅडमिरल आर हरी कुमार, नौदल प्रमुख