Breaking News

उरणमध्ये विकासकामांचा शुभारंभ

दिघोडे येथे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील दिघोडे गावात विविध विकासकामांचा शुभारंभ झाला असून या कामांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 17) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले.

दिघोडे गावात जाणार्‍या रस्त्याची दयनिय अवस्था झाली होती. नागरिकांना त्याचा त्रास होत होता, ही समस्या लक्षात घेत गावाच्या विकासासाठी मेहनत घेणारे जय मातादी ग्रुपचे अध्यक्ष मयूर घरत, रमेश (नाना) पाटील व निलेश पाटील यांनी या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी आमदार महेश बालदी यांच्याकडे केली. आमदार महेश बालदी यांनी आपल्या स्थानिक विकास जिल्हा नियोजन निधी अंतर्गत दिघोडे येथील एसटी बस थांबापासून श्री राम मंदिराकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे व गटाराचे बांधकाम करणे आदी कामांकरिता निधी दिला. त्यानुसार या कामांचे भूमिपूजन शुक्रवारी आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत, उरण नगर परिषद उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, दिघोडे सरपंच सोनिया मयूर घरत, माजी सरपंच एकनाथ माळी, अंबाजी कोळी, ग्रामपंचायत सदस्य शरद कोळी, उर्मिला कोळी, कविता म्हात्रे, शारदा कासकर, जय मातादी अध्यक्ष मयूर घरत, रमेश (नाना) पाटील, भाजप युवा अध्यक्ष निलेश पाटील, भाजप गाव अध्यक्ष राजेश पाटील, मयूर माळी, अश्विन पाटील, राकेश म्हात्रे, भावेश म्हात्रे, मयूर पाटील, सुधीर बुवा पाटील, अस्मक पाटील, विनय म्हात्रे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply