Breaking News

जागतिक योग दिनानिमित्त योगासने व स्वच्छता मोहीम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जागतिक योग दिनानिमित्त मंगळवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत माची प्रबळगड येथे योगासने करण्याची संधी मिळणार असून योग दिनाचे औचित्य साधून प्रबळगड येथे स्वच्छता मोहीमही राबविली जाणार आहे. 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने माची प्रबळगड येथे होणार्‍या या कार्यक्रमात पनवेलच्या आरोग्य सेवा समितीचे योग केंद्र प्रमुख सूर्यकांत फडके, सहशिक्षक अरविंद गोडबोले योगसाधनेसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत युवा व ज्येष्ठ योगासने करणार आहेत. त्यानंतर प्रबळगड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply