आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माची प्रबळगड येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी योगसाधना केली. या कार्यक्रमात पनवेलच्या आरोग्य सेवा समितीचे योग केंद्र प्रमुख सूर्यकांत फडके, सहशिक्षक अरविंद गोडबोले यांनी योगसाधनेसंदर्भात मार्गदर्शन केले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक हरेश केणी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, बेलवलीच्या सरपंच संगीता भुतांबरा, सतीश पाटील, सदस्य दिनेश पाटील, अमिता पवार, हेमंत तांडेल, रोहन घरत, चिन्मय समेळ, अभिषेक भोपी, विशाल पवार, आशिष कडू, मयूर कदम, पवन भोईर, साधना पाटील, यांच्यासह युवा व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी योगसाधना केली.
आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस वर्षातील सर्वांत मोठा दिवस आहे आणि योगसाधनादेखील व्यक्तीला दीर्घ करते. 21 जून 2015 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला, ज्याची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र (युनो) महासभेत केलेल्या भाषणात केली होती. त्यानंतर 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून घोषित करण्यात आला. 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या 177 सदस्यांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. पंतप्रधान मोदींचा हा ठराव 90 दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने मंजूर करण्यात आला, जो संयुक्त राष्ट्रामध्ये कोणत्याही दिवसाच्या ठरावासाठी सर्वांत कमी वेळ आहे.
योगाभ्यास भारताच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. त्याचे महत्त्व स्वामी विवेकानंदांनीही अधोरेखित केले होते. योगसाधना केवळ शारीरिक तंदुरुस्ती आणत नाही, तर जास्तीत जास्त मानसिक शांती देते. त्यामुळे ताण-तणावही कमी होतो. यासह हे शरीराच्या सर्व क्रियाकलापांवरदेखील नियंत्रण ठेवते. शरीराचा रक्तप्रवाह योगाद्वारे नियंत्रित केला जातो, ज्यामुळे शरीरात चपळता येते. त्याचप्रमाणे सकारात्मकतेची भावना वाढते.