रोहे ः प्रतिनिधी
रोहा येथे 10 हजारांची लाच घेताना जिल्हा परिषद शाखा उपअभियंता भोजवंता अमृतराव शिंदे याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंध विभाग पथकाने बुधवारी (दि. 22) जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग रोहा येथे रंगेहाथ पकडले आहे.
रोहा तालुक्यातील शेणवई येथील सामाजिक सभागृहाचे बांधकामांचे प्रलंबित बील मंजूर करण्याकरीता व अतिरिक्त अनामत रक्कम परत देण्याकरीता रायगड जिल्हा परिषद शाखा उपअभियंता भोजवंता अमृतराव शिंदे वय 37 यांनी ठेकेदाराकडून 10 हजारांची मागणी केली होती. ठेकेदारांनी ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्याकडे केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक सुषमा सोनावणे, पो. ह. अरुण करकरे, विनोद जाधव, महेश पाटील, पो. ना. जितेंद्र पाटील, सचिन आटपाटकर या पथकाने सापळा रचून बुधवारी कार्यालयात 12.55 वाजण्याच्या सुमारास भोजवंता अमृतराव शिंदे यांना 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.