उरण ः प्रतिनिधी : गोवठणे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2019चे मतदान रविवारी (दि. 23) होत आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी तसेच शेतकरी कामगार पक्ष युतीचे उमेदवार उभे आहेत. सरपंचपदासाठी वर्तक दीप्ती विक्रांत हे उमेदवार आहेत. प्रभाग क्र.1मधून उमेदवार म्हात्रे स्मिता रोशन, वर्तक दीप्ती किशोर, म्हात्रे हर्षद हरिभाऊ, प्रभाग क्र. 2मधून म्हात्रे सिद्धांत विलास, पाटील प्राची निर्णय, वर्तक संतोष दशरथ, प्रभाग क्र. 3मधून म्हात्रे विश्रांती विद्यानंद, म्हात्रे रत्नमाला ओमकार, पाटील मनोज अशोक हे उमेदवार उभे आहेत. या उमेदवारांना विजयी करण्यासाठी गोवठणे येथे भव्य रॅली काढण्यात आली.
गोवठणे ग्रामपंचायतीवर भाजप-शेकाप युतीचा झेंडा फडकणार, अशी प्रतिक्रिया गोवठणे भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांनी व्यक्त केली आहे. या रॅलीत भाजप जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, तालुका चिटणीस नीलखंड घरत, सुनील पाटील, तालुका सरचिटणीस दीपक भोईर, तालुका उपाध्यक्ष शशी पाटील, विभाग अध्यक्ष कुलदीप नाईक, प्रीतम म्हात्रे, कामगार आघाडी रायगड जिल्हा चिटणीस जगदीश म्हात्रे, उरण तालुका महिला मोर्चा सरचिटणीस राणी सुरज म्हात्रे, कार्याध्यक्ष सुरज म्हात्रे, गोवठणे शाखा अध्यक्ष रोशन म्हात्रे, महिला अध्यक्ष विश्रांती विद्यानंद म्हात्रे, संतोष वर्तक, सर मिता म्हात्रे, स्वाती पाटील, विक्रांत वर्तक, हर्षल म्हात्रे, किरण म्हात्रे, किशोरी वर्तक, कविता म्हात्रे, तनुजा म्हात्रे, कल्पना वर्तक, सुरेंद्र पाटील, प्रेम पाटील, अनिल म्हात्रे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.