पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 26) तब्बल 170 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 87, पनवेल ग्रामीणमधील 29, पेण तालुक्यातील 16, खालापूर तालुक्यातील आठ, उरण, अलिबाग, रोहा व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी सहा, तर कर्जत व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी तीन जणांचा समावेश आहे. मृत पावलेले तीन रुग्ण पनवेल ग्रामीणमधील दोन व पनवेल महापालिका हद्दीत एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 66 जण बरे झाले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला असून, हा आकडा 3076 झाला आहे तसेच आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाला आहे
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …