Breaking News

प्रलंबित वृक्षछाटणीची मागणी; भाजपच्या बीना गोगरी यांचे निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित वृक्षछाटणी तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी भाजप खारघर-तळोजे मंडलच्या उपाध्यक्षा बीना गोगरी यांनी पनवेल महापालिकेच्या संबंधित विभागाला निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे किंवा वादळी वार्‍यांमुळे गृहसंकुले किंवा फुटपाथवरील वृक्ष मूळासकट उपटणे किंवा झाडांच्या फांद्या तुटणे असे अपघात घडतात. ह्या अपघातांमुळे एखादी जीवित हानी होणे किंवा नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होणे हे प्रकार घडतातच, पण त्याचसोबत 10 ते 12 ते वर्षांत पूर्णपणे वाढलेले वृक्ष उपटून पडल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. पालिका क्षेत्रातील प्रलंबित वृक्षछाटणी करण्यात यावी, खारघर सेक्टर 19 येथील अजयदीप सोसायटी समोरील फुटपाथवरील एका झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. सुदैवाने त्यावेळी झाडाच्या जवळपास कुठलेही वाहन किंवा नागरिकांची उपस्थिती नसल्याने गंभीर अपघात टळला. त्यामुळे धोकादायक फांद्यांची छाटणी तत्काळ करण्यात यावी, असे गोगरी यांनी महापालिकेच्या विभागीय कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply