पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे याही नवीन शैक्षणिक वर्षात येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये पाचवी ते बारावी अखेरच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वितरण करून आपली सामाजिक जबाबदारी जोपासली जाते, असे प्रतिपादन मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी या वेळी केले. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे सदस्य विश्वनाथ कोळी यांचेही समयोचित भाषण झाले. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य तसेच श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मोफत वह्या वितरण सोहळ्यास विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंता ठाकूर व विश्वनाथ कोळी, गव्हाण ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय घरत, ज्येष्ठ नेते वसंत पाटील, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्यद्वय प्रमोद कोळी व रवींद्र भोईर, रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे, ग्रंथपाल महेश म्हात्रे आदींसह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपशिक्षक श्री.सागर रंधवे यांनी केले.