Breaking News

धाटावमधील वायुप्रदूषण करणार्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी

अमित घाग यांचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन

धाटाव : प्रतिनिधी

वारंवार वायूप्रदूषण करणार्‍या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजयुवामोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी शुक्रवारी (दि. 24) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली.

रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक रासायनिक कारखाने आहेत. मोसमी पावसाचा  फायदा घेऊन यातील काही रासायनिक कारखाने  वायुप्रदूषण करीत आहेत. या वायूप्रदूषणाने गेल्या काही दिवसापासून परिसरातील नागरिक व कामगार हैराण झाले आहेत.

मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण झाल्यामुळे गुरुवारी (दि. 23) धाटाव, तळाघर, लांढर, बोरघर, निवी, वरसे, वाशी, रोहा शहर, उडदवणे, रोठ, महादेववाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार वायूप्रदूषण करणार्‍या कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक कारवाई  करावी, तसेच धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये कायमस्वरूपी  अधिकारी द्यावा, अशी मागणी अमित घाग यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आर. एस. कामत व माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

वायूप्रदूषण करणार्‍या कारखान्यांवर कारवाई करण्यासंदर्भात भाजयुवामोर्चाने निवेदन दिले आहे. त्याबाबत वरिष्ठांना कळविले जाईल तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍या कारखान्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

-आर. एस. कामत, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply